चौक

ही कविता उगाच नाही लिहिली
दूर अंतरावरच्या मित्राला साद आहे.
एका आर्त हाकेला 'ओ' आहे
आठवणींच्या रोपट्याला पाणी आहे.
तू ही असाच बोलशील माझ्याशी
राहिलेले आणि साठलेले दोन्हीही.
माध्यमांच्या तकलादू भिंती
समाजाने उखडून टाकल्यावर.
की, तरीही काही असेल बाकी?
तुला न कळलेले वा मला न झेपणारे.
असो. जाऊ दे मला काय त्याचे
ज्याची तुलाही फिकीर नाही.
कैफियत बयां करावी भर चौकात
या एकट्या मार्गावर चौक कसा सापडावा?
ऐक, तू असं कर मार्ग बदल
आपण चौक तयार करू.
तू दुसरी वाट चाल
मी मैलाचा दगड होतो.

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}