[कविता' २०२०] - ......फूल/ पिस्तूल ठेविले.

......फूल/ पिस्तूल ठेविले.

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले

अंतरधर्मी नाते अपुले, मान्यच नव्हते दुनियेला या
जगलो आपण कसेतरी पण नाव मुला मकबूल ठेविले

कुणी चहाडी केली अपुली, कसे समजले आईला हे?
कोण विचारी, समोर तेव्हा तुझे बिलोरी डूल ठेविले

भीक देईना कुणीही जेव्हा झोळीमध्ये तिच्या अभागी,
पाझर फुटण्या लोकदयेला शेजारी मग मूल ठेविले

नाव पाहूनी मिळती लाईक, अर्थ जरी का कळला नाही.
ओळखून ही रीत जगाची तखल्लुस "सोकूल" ठेवले.

(मतला उधार घेतला आहे, त्याचा शायर माहित नाही.)

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}