[कविता' २०२०] - उचकी

उचकी

आय म्हनायची, “उचकी आली, कोन बरं आठवन काडत आसंल?”
झूट है सब, आटवनीने पोट भरत नाय,
अन आपल्याला कदीबी उचकी येत नाय.

कसल्या आटवनी अन कोनाच्या आटवनी ?
आपल्याला कुनाचिबी आटवन येत नाय,
अन आपली कोनबी आटवन काडत नाय.

बां मेला, काबाड-कष्टानं आय गेली,
भैनिनी त्वान्डाला काळ फासलं, चुलत्यानं घर घशात घातलं,
येकलेपनाला आपन भीत नाय.

“कस्मे, वादे, प्यार, वफा, सब बाते है, बातोंका क्या?
कोई किसीका नही है झूठे नाते है, नातोंका क्या?”
मन्नादा खोटा बोलत नाय.

शिक्षान सोडलं, रिक्षा धरली,
रिक्षा चालवताना कदीबी आपन पित नाय,
आन पोलिसाच्या तर बापाला बी भीत नाय.

समुर दारूचा गलास, हातात शिग्रेट,
बशीत चनं आन चाकायाला मिट,
बस आनकी काय बी लागत नाय.

बार फुडल्या भिकार्‍याला न इसरता दोन-पाच रुपये देतो,
तो बी हासून राम-राम करतो,
रामरामासाटी आनकी काय बी लागत नाय.
…………………………………..
………………………………………..

भिकार्‍याला आज मुद्दाम काय दिलं नाय,
आशेने बगत व्हता पन मुद्दाम लक्षच दिलं नाय.
म्हनलं आज तरी उचकी यील काय ?

आज तरी उचकी यील काय?

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}