खेळ

खेळाचे नियम तेच असतील
खेळ एकट्याने खेळायचा नाही
त्यांना बहिष्कृत करण्यात येईल
जोडीदार बदलायचा असेल
तर रितीरिवाज पाळावे लागतील
खेळ मधूनच सोडायचा नाही
कायद्याने तो गुन्हा आहे
कोणी बेईमानी केली
तर तुमच्यासाठी ते आव्हान ठरेल
खेळात कोणाची मदत घेतली
तर चालेल
खेळ तोपर्यंत खेळला जाईल
जोपर्यंत तो अस्तित्वात आहे
आणि सर्वात महत्त्वाचे
खेळ खेळून झाल्यावर
तुम्ही जिंकलात की हरलात
हे तुम्ही स्वतःच ठरवायचे आहे
खेळाचे नाव आहे
राजा, राणी आणि संसार

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}