[कविता' २०२०] - पोपट

पोपट

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले

पसरती तश्रीफ माझी, आरामखुर्चीतही मावेना
थोरला झोपाळा हवा, तिथे कुणी स्टूल ठेविले

लावणारच होतो आग मी, जगास माझ्या ठिणगीने
वातानुकुलाचे सेटिंग, तिथे कुणी कूल ठेविले

म्हातारलो इतका की, म्हातारचळही सोसवेना
काळीज रिते हवे, तिथे कुणी मूल ठेविले

जिंदगी पोपट जाहली, अश्या तोऱ्यात की
तिखटजाळ मिसळ हवी, तिथे कुणी अमूल ठेविले

प्रेरणा : https://www.misalpav.com/comment/1065395#comment-1065395

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}