[कविता' २०२०] - कोण आहे तिथे

कोण आहे तिथे

डोंगर रांगांच्या पल्याड लपले आहे एक गाव
कोण आहे तिथे , विचारु नका तुम्ही राव

गावाकडची वाट कशी किर्र जंगलातुन जाते
वाटेमधे लांडग्यांची फौज तुमची वाट पाहते

गावाकडची वाट कशी उंच टेकड्यांतुन जाते
खोल खोल काळदरी कधी तुमचा घास घेते

गावाकडे जाताना वाटेत आहे एक नदी
मगरी कुठे नाहीत ना , पाहुन घ्या आधी

गावातल्या पडक्या वाड्यात लपला आहे खजिना
पिवळाधमक राखणदार तिथे काढुन बसतो फणा

चेटकिणींचा जाप चालतो रोज रात्री वाड्यात
हडळींनाही कंठ फुटतो भयाण अंधारात

मशाल पेटवुनी भुते नाचती ओसाड वेशीवरती
भान हरपुनी बघत राहती सैतानाच्या करामती

काय म्हणता खोटे सारे , या असती भय कल्पना
चला जाउया आपण सारे , नको फुका वल्गना

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}