एकटेपण

जमव जमव जमवले
भांडी, गॅस, बेड, कपाट, कपडे,
टिव्ही. पुस्तके आणि काॅप्युटरसुद्धा.
माणसं सुद्धा मिळाली जन्माने,
काही जमवली निष्फळ
शेवटी उरले निर्जीव एकटेपण.
जीव लावला इथुन तिथुन,
अगदी गॅस पुसायच्या फडक्याला
दिवसभर हाती असणार्या माऊसला
आॅफिसातल्या डेस्कला
समजत राहीले हे माझेपण
शेवटी उरले निर्जीव एकटेपण
जपत गेले छंद मजेने
झाडं लावली, पुस्तकं आणली
वाचली कागदावरची निर्जीव माणसं
जीवंत माणसं वाचायची राहीली
उमजत गेले गर्दिचे फोलपण
शेवटी उरले निर्जीव एकटेपण
अपेक्षाही वाढवुन घेतल्या
पुर्णत्वाची आस लावली
जीव जाळुन घेतला
मोहमायेच्या गर्तेत खोल उतरले
उमजत गेले मायेचे रितेपण
शेवटी उरले निर्जीव एकटेपण
शेवटी रुतले गाळात
गाळ मला रुतवत चाललाय
अगदी खोल खोल
आता लक्षात आलय माझ्या
बाहेर पडणे अवघड
शेवटी उरणार नाही काहीच
नुसत्या शुन्याशिवाय

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}