वाग्मोती

ऐकले मी तुला, काव्यगान करताना
पाहिले मुखी तुझ्या, भाषेला खेळताना ।।
नादमधुर लय अशी, वर्णनांस करवेना
स्वरसंतुर रव तुझा, माधुर्ये साहवेना ।।
जणू...
शारदेचे नूपुर ते, किणकिणले हलताना
कनक ते कर्णीचे, थरथरले डोलताना ।।
मोरपीसं मोहरली, सळसळली नाचताना
वीणेवरील कंपने, वाणीतून वाहताना ।।
स्फटिकमणी बोटांतून, सरसरले 'जप'ताना
स्वये वागेशी अवतार, वाग्यज्ञे प्रकटताना ।।
सुबक वृत्त चाफ्याचे , काव्यकुसुम रचताना
गंधित शब्द मोगऱ्याचे, नाजूक ते वदताना ।।
गहिरे अर्थ केवड्याचे, हलकेच उलगडताना
आरक्त हास्य प्राजक्ताचे, "वा! वा!"आमचे घेताना ।।
तूच 'श्री' या मैफिलीत, ऐश्वर्ये बहरताना
आम्ही झालो अंकीत, वाग्मोती वेचताना ।।

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}