समर्थ

॥ खाती मनीचे मांडे । अवघे लाचारांचे तांडे । अन घोळविती गोंडे । पुछडीचे ॥
॥ जनता बिचारी । कुणी ना विचारी । सदैव लाचारी । थोबाडी वसे ॥
॥ ऊठ ऊठ वेड्या । तोड तोड बेड्या । गर्ज मऱ्हाटा गड्या । केसरिपरि ॥
॥ अवघे जग झुकत । करेल जंगी स्वागत । समर्थांचे मनोगत । धरिता हृदयी ॥

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}