[कविता' २०२०] - मिपाकर

मिपाकर

व्यक्त होती हो सहजपणे
असो प्रथितयश वा नवआगत ॥१॥
गद्य पद्य वा प्रवासवर्णने
पाक,तंत्र अन् चर्चांची रंगत ॥२॥
कृषीजगताचे हिरवे लेणे
कलादालनी विविधा उधळत ॥३॥
दाद पसंतीची खुलून देणे
नाराजीची कधी झडते नौबत ॥४॥
अखंड तरीही स्फुरणे,फुलणे
मिपाकरांची ही खासियत
मिपाकरांची ही खासियत ॥५॥

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}