सांजवेळ

( चैत्र महिन्यात खिडकीतून रोजच दिसणा-या दृष्याचे शब्दचित्र)
आकाशाच्या पृष्ठावरती,मावळती ते रंग पसरवी
डोंगरमाथ्यावरती शोभे,वृक्षांची ती झालर हिरवी ॥
सिरीसवृक्ष तो अपुली छत्री,वा-यासंगे हळु डोलवी
लालगुलाबी तंतुफुलांवर,शत राव्यांचे दल झेपावी ॥
सांजदिव्यांची तिरीप घेऊन,उजळे गर्द-फिकी हिरवाई
पर्णहीन त्या काष्ठतरूवर, बगळ्यांची मग फुले फुलावी ॥
तलम,चुरमुडी,पाचपाकळी,थरथरणारे परागकेसर
पानापानांतून डोकावे,वसंतसाक्षी सुवर्णमोहर
वसंतसाक्षी सुवर्णमोहर॥

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}