तू गेलीस तेंव्हा

दिवेलागणीला , सांज घनव्याकुळ कंपित
वितळला मेघ शापित, पापण्यांच्या डोहात ||
रंगगंध विस्कटले, आकाशी निजला सूर्य
कापरे दिव्यात रात, चैत्रस्पर्श सुगंधीत ||
पेटले आकाश सारे, रक्तगंधाचे दिवे
उजळल्या शब्दओळी, ओठांच्या तबकात ||
रात्र उभी पापण्यात, काजळ अंधार मनी
उसवले श्वासधागे, काळजाच्या अंतरात ||
उडाले प्राणपक्षी, सजवाया नभकोंदण
किती स्मरु चंद्रखुणा, स्वर्गज्योत उजळीत ||
मालवून स्वप्नदिप, रीती आसवांची झोळी
क्षितिजावर विरल्या हाका, खिन्न गर्भरात ||

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}