करोनाचे गर्वगीत

ओळखलेस कारे मला तू, आपलं अद्वैत नातं आहे l
विश्वाचा रंगमंच आपलाच, नाटक आपलं रंगत आहे ll
युगायुगांचीं संगत अपुली , विसरलास तू काय गड्या l
सिद्धांत आहे माल्थसचा, विसरलास रे तू गधड्या ll
नवा अवतार मी आहे, मी अवतार विध्वंसाचा l
सत्य सुंदरच आहे, मी अवतार आहे शिवाचा l
चीन माझा भारत माझा , अमेरीकाही माझीच आहे l
हे विश्वची माझे घर, मी विज्ञानेश्वर आहे ll
वसुंधरेच्या आक्रोशाचा शिल्पकार तू रे दगडा l
तू पामर मानवा, शिकविला तुला मी नवा धडा ll
नाती घडवली-बिघडवली, नवे महाभारत रचतो आहे l
लॉक-आऊटच्या कुरुक्षेत्री, मीच तुझा सारथी आहे ll
निरोप घेऊ या रे आता, मीही प्रवासी अनंताचा l
प्रभा चिद्विलासाची फाकली, तुही पुत्र अमृताचा ll

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}