कोऽहम् ?

मी न शांता, मी न बहिणा ।
मी न इंदिरा, मी न जना ॥
नाही अभंग, नाही गाथा ।
माझ्याच व्यथा, सा-याच कथा ॥
माझ्याच पंक्ती, माझ्याच ओठी।
शब्दही स्तब्ध, माझ्याच साठी ॥
माझीच गाणी,गुंफिली तराणी ।
माझीच कहाणी, रचिली विराणी॥
अहो,कसले छंद, कुठल्या मात्रा ।
रिजवतील फक्त माझ्याच गात्रा ॥
नसेल सम्यक, माझे यमक ।
मीच सुचक, मीच वाचक ॥

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 2500px;
}