वाटा....

ठरलं अनंत वाटाच,अंती ध्येय,
कसली सिद्धता, कुठले प्रमेय?
दाही दिशांची यात्रा दरमजल,
नव्या वळणावर, नवी गजल,
कधी तुक्याची सोपी पायवाट,
कधी फंदींची धोपट,वहिवाट,
कधी करावी जरा वाकडी वाट,
होईल कुण्या गतजन्मीची भेट,
वाट जिथे संपवशील तू प्रारब्धा,
नवी वाट शोधेन मी आरब्धा,
पुन्हा मग अनंत वाटा अंती ध्येय,
कसली सिद्धता, कुठले प्रमेय?

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 2500px;
}