क्वारंटाईन!

आलो तुझ्याचसाठी
सेव्हन समुद्रावरून
कंटाळून प्रेमाला, सदा
करून ऑनलाईन
सखये आलो कमवून
बंडल काही डॉलरांचे
निवांत फिरूया दोघे
सारे स्पॉट टुरिस्टांचे
यंदाच करून शुभमंगल
पुढच्या वर्षी लिटल सन
पाहतो उघड्या डोळ्यांनी
हे ड्रीम फ्लाईटात बसून
हाय! पडला हाती छाप
विथ सरकारी डिझाईन
तू तिकडे लुकिंग फॉर्वर्ड
मी इकडे क्वारंटाईन!

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 2500px;
}