[शशक' २०२०] - बँक बॅलन्स

बँक बॅलन्स

"तुला पगार किती ए?"
"तीस हजार"
"कशावरून"
"मी तुम्हाला सॅलरी स्लिप दाखवतो” असं म्हणून माझ्या सॅलरी स्लिपची सॉफ्ट कॉपी मोबाईलवरून तिच्या वडिलांना दाखवली.
"बनावट सॅलरी स्लिप्स कुठेही बनवता येतात"
"अहो खरचं ही कंपनीची ओरिजनल सॅलरी स्लिप आहे"
“नाही... मला तुमचा बँक बॅलन्स दाखवा”
मी लगेच मोबाईल वरून बँक अकाउंट मध्ये लॉग इन करून, त्यांना माझा बँक बॅलन्स दाखवला
त्यांनी बँक बॅलन्स बघितला आणि…….
….. तिच्या वडलांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला.
लग्नाची बोलणी तिथेच फिस्कटली, त्यानंतर तिची आणि माझी परत कधीच भेट झाली नाही.
माझं ते पहिलं प्रेम अधुरं राहिलं कारण,

पर्सनल बँक अकाउंट दाखवण्याऐवजी चुकून पीएफ अकाउंटचा बॅलन्स दाखवला होता.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}