घालमेल

तिची चाहूल लागली. मनात विचारांचे काहूर माजले. एवढी आतुरतेने वाट पाहत असताना तिची काही खबरच नव्हती. खरंतर ह्यावेळेस जीवाला हुरहूर लागून राहिली होती. मागची खेप अशीच हुकली होती. आता ह्यावेळेस मात्र संधी सोडायची नाही असं ठरवलं होतं.
मिळणाऱ्या संधीचे सोनं करण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव सुरु केली. कधी वाटायचं शब्दांचे अलंकारिक हार गुंफावेत. तर कधी वाटायचं खळ्ळ खट्याक करून टाकावं.
पण वेळेवर ना शब्दांची आभूषणे सापडत होती ना खळ्ळ खट्याक करायला शस्त्र. हातातून वाळू निसटावी तसा वेळ हातातून सुटत होता. मनाची घालमेल सुरु झाली. शब्द वेळेत साथ देतील ना. घड्याळ टिकटिकत होतं. आणि
.
.
.
रात्रीच्या पावणेबारा वाजता माझी शशक शशकस्पर्धा २०२० साठी पाठवली.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}