[शशक' २०२०] - Appraisal

Appraisal

साहेब, ह्या वेळेस तरी बघा काही माझे... सालाबादाप्रमाणे यावेळी पण टपकला तो
अरे चचा, ह्या शशककथा स्पर्धा आल्या म्हणजे काय Appraisal आले असे वाटते का काय तुम्हाला ?
आणि आता तुमचा विचार पण करू शकता नाही मी .. कधी त्या हूर सोडून खाली बघत जा काय चाललेय ते .. भडकलाच तो HR पोट्टा परत..
अर्थात त्या पोराला पण दोष देण्यात अर्थ नव्हता म्हणा .. ह्यावर्षी मार्चपासून खुप स्पर्धा वाढली असे ऐकून होता तो. दररोज शेकड्याने लोक येत होते, मोठ्ठे मोठ्ठे "टार्गेट" पूर्ण करून, आणि वर येऊन पण खाली टार्गेट वाढतच आहे म्हणे ...

कसे काय जमते बुवा यांना..विचार करत याकूब परत निघाला.. कसाब रिपोर्टींगला ...

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}