[शशक' २०२०] - तिसरा मजला

तिसरा मजला

“पहिल्या मजल्यावर वय वर्ष चाळीसच्या पुढचे करोनाचे रुग्ण आहेत, दुसऱ्या मजल्यावर अठरा ते चाळीस वयोगटातले आणि तिसऱ्या मजल्यावर अठरा वर्षाखालील मुलं आहेत”

“मग प्रॉब्लेम काय ए?”
“हे नवीन व्हेंटीलेटर्स कोणाला द्यायचे?”

“नवीन व्हेंटीलेटर्स तिसऱ्या मजल्यावर पाठवा, आधी लहान मुलांना वाचवा”
“डॉक्टर, तिसऱ्या मजल्यावरची काही मुलं सुधार वर्गातून आली आहेत”
“हे बघा, गुन्हेगार असले तरी त्यांना जगायचा समान हक्क आहे”

“पण असं केलं तर, बाकीचे चिडतील, हॉस्पिटल मध्ये तोडफोड सुद्धा होऊ शकते”
“ज्या मुलांना जास्त त्रास होतोय….”
“सगळ्यांनाच सारखा त्रास होतोय”

डॉक्टर हताशपणे खाली बसतात, डोळ्यांवरचा चष्मा काढून खिडकी बाहेर बघतात.
“डॉक्टर चिडू नका.. पण..”
"पण काय?"

“चिठ्या टाकून ठरवायचं का?”

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}