मेजवानी

परवा एक वटवाघूळ खाल्ले. झकास होते. च्याऊंग गुहेच्या आतल्या भागात सापडले. मेजवानीच. पण काहीही म्हणा, डोंगराखालच्या मातीत वळवळणाऱ्या गांडूळाची सर कशालाच नाही. संध्याकाळी अजगराची कातडी सोलताना ठसका लागला. मग दोन उंदीर खाल्ले तेव्हा कुठे आराम पडला. रात्री सुग्रास कुत्रं खाऊन निवांत झोपलो.
सकाळी खोकतंच उठलो. बागेत जाऊन दोन लुसलुशीत सुरवंट गिळले. मग दोन मांजरी पकडून, कापून, फोडी फोडी करून, मिरची आणि कोथिंबीर लावून बरणीत मुरवायला ठेवले. कच्च्या फोडी म्हणजे स्वर्गसुखच.
मग बेडुक फ्राय आणि झुरळांची चटणी असा खमंग नाष्टा केला. पण खोकला थांबेचना. मग माकडाचे सुप पिलो. संध्याकाळी ताप आला आणि डोके दुखायला लागले.
तेव्हा समजले, खाण्यात काहीतरी चुकलंय जरूर..

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}