ज्यात त्यात बटाटा

"ज्यात त्यात बटाटा घालतात इथे .. " उत्तर प्रदेशात एकदा जवळ जवळ महिना घालवल्यावर अशी वैतागवाडी झाली होती... हम्बल spaD ( गरीब बिचारा बटाटा ) असे ज्याचे वर्णन केलं जाते तो हा पामर ... यात अनेक जाती असतात ..रंग /चव आणिआकार वेगवेगळे.. मराठी पद्धतीची पातळ खरपूस काचऱ्याची भाजी असो , "गर्भश्रीमंत " दम आलू असो किंवा जर्मन पोटॅटो रोस्टी असो... जगभर फिरणारा हा प्राणी... यातील एका चविष्ट बटाट्याची ओळख..
किपेंफ्लर ( kipfler उच्चार आपापल्या सोयीप्रमाणे करणे ) हि त्यातील एक चविष्ट जात.. लांबुडक्या आकाराचा हा बटाटा .. पातळ त्वचा असते त्यामुळे त्वचेसंकट वापरले तर चालतात ...
IMG_7552[1]

याची एक सोप्पी पाककृती
१)
- बटाटे धून लांबी नुरुप कापून घयावे
- उकळत्यापाण्यात ७-८ मिनिटे अर्ध शिजवावे
- टिपकागदावर ठेवणं पाणी निथळू द्वावे आणि थंड होऊ दवयेत
IMG_7557[1]
२) याला विविध प्रकारचे मसाले लावू शकत,,, मी येथे २ प्रकारचे वापरले आहरेत
एक: तेल ( उच्च तापमानाला चालेल असे वापरवे ) मीठ ( समुद्री ) आणि ताजी चिरलेली रोझमेरी यात घोळवाले आहेत
दोन: तेल ( उच्च तापमानाला चालेल असे वापरवे ) मीठ ( समुद्री ) आणि धुरी दिलेली पाप्रिका आणि थोडा मध , थोडी काली मिरी
यशीयवाय इतर हि मसाले जोड्या वापरू शकता पण ते फार जहाल नसावेत कारण यात आपल्याला मूळ बटाटयाची चव घेईची आहे
यात मी लसूण घातलेली नये
IMG_7555[1]
IMG_7556[1]
IMG_7562[1]
IMG_7567[1]
भाजणे:
ओव्हन मध्ये २०० अंश वर ठेवून ट्रे तापवून घयावा आणि मग त्यात बटाटे पसरून खरपूस होई पर्यंत भाजावे , शेवटची काही मिनटे ग्रिल करी ठेवावे
IMG_7573[1]
IMG_7576[1]

सोबत पेय: मज्जा म्हणून पीच चहा + लेमन लाइम बिटर सारखे अतरंगी पेय एकतर केले ..
- मांडणीत आम्बट लोणी ( सावर क्रीम) सोबत ( गोड नको )
IMG_7579[1]
IMG_7580[1]
IMG_7575[1]
IMG_7582[1]

सर्व मिपाकरांना जाहीर आव्हान.. आणि आवाहन
घरबंदी दारूबंदी च्या काळात घरात बटाटा तरी असावा बहुतेकांकडे .. चला तर मग बनवा काहीतरी आणि बाणा " मिपा फास्टरशेफ "
बटाट्या पासून बनविली काही दारू हि असते ती पण वापरू शकता !