सहवास

" उठ लवकर किती वाजलेत बघा जरा"
" हो बाई, वाजलाय अलार्म तुमच्या रेकॉर्डेड गाण्याचाच "
" चटकन आवरून ब्रेकफास्ट करून घे "
" दडपे पोहे, नाश्त्याला ? स्वतःची आवड मारा आमच्या माथी ! फक्कड जमलेत हो ! "
" बाल्कनीतल्या झाडांना पाणी घालायचं विसरू नको "
" जास्वंद काय बहरलाय गं ! "
" कधीतरी हात जोडत जा रे देवासमोर "
" गणेशराव, हे घ्या तुमचं आवडतं फुल "
"आटपलं का साहेब, चल उशीर होतोय "
" ये पार्किंग मध्ये गाडी काढतोय "
" पॉडकास्ट नको लावूस रे सकाळी, एफएम चालू कर "
" हायला स्वदेसचं "पल पल है भारी", आपला पहिला पिक्चर ना, आणि अगं एक सांगायचं राहिलं ”
-------
" काल जोशी कुणाला सांगत होता, कसा जगतोय हा ? फार वाईट झालं ह्याची बायको फारच अकाली गेली "

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}