[शशक' २०२०] - मोका

मोका

मध्यरात्री ती एकटीच बाहेर पडली. अंधारात डोळे सरावण्यास वेळ लागला पण कमी प्रकाशात अंदाजानेच ती चालू लागली. बराच काळ ती सुरक्षा कवचात सुखरूप होती. इतका वेळ दबा धरून बसलेल्यांना ती एकटीच व असहाय्य असल्याचे जाणवल्यावर त्यांनी तिच्या रोखाने सरकण्यास व घेरण्यास सुरूवात केली....प्रत्येकालाच तिला पहिल्यांदा गाठून मोका साधायचा होता. तिला आता धोक्याची जाणीव झाली व ती एका कोपर्‍यात सरकली. ते सगळे तिच्यावर झडप घालणार इतक्यात चाचपडणार्‍या तिच्या हातांना काहीतरी लागले. तीने सपासप त्याचे वार तिच्या रोखाने येणाऱ्यांवर चालवले. निरव शांततेमध्ये तो आवाज भयानक वाटत होता. बाकीचे धूम पळून गेले.....
……….
……….
……….
……….
……….
घामाने डबडबलेली ती परत मच्छरदाणी वर करून गादीत शिरली.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}