[शशक' २०२०] - चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला

राष्ट्राध्यक्षांच्या भाषणानंतर संपूर्ण राष्ट्रं भारावले होते. चंद्रावर स्वारी!!!!

नासाचे शास्त्रज्ञ अविरत काम करत होते. सगळं सुरळीत चालू असताना अचानक काही तांत्रिक समस्यामूळे मिशन बंद करण्याची वेळ आली होती. पण परतीचं दोर कापले गेले होते. आता माघार शक्य नव्हती. रशियाबरोबरच्या शीतयुद्धामुळे राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. नाईलाजास्तव दुसरा पर्याय निवडला गेला.

तयारी पूर्ण झाला होती. सगळं व्यवस्थित पार पडायला हवं होतं. आर्मस्ट्रॉंगने मिळालेल्या सूचनेप्रमाणे यानातून पाऊल बाहेर टाकले
“One small step for Man, one giant leap for Mankind”
समोरून "कट" "शॉट ओके" चा आवाज आला. स्टुडिओमधें असलेल्या सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
They were trying to fool all the people all the time.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}