[शशक' २०२०] - किक

किक

"थांबा दादा, प्लीज थांबा..." रणजीत बुलेटच्या मागच्या सीटवरून लगेच उतरला. बुलेट चालवणाऱ्या 'भवानी समाजसेवा मंडळा’च्या अध्यक्षांना क्षणभर काही कळलेच नाही. तोंडात ठासून भरलेल्या गुटख्याच्या पिंकेला सावरत मंडळाच्या अध्यक्षांनी आपली क्लासिक ५०० सीसी बुलेट थांबवली.

"काय रं रनज्या...काय झालं?" अध्यक्ष मुखरस तोंडात घोळवत म्हणाले आणि त्यांनी पुन्हा ओठांचा चंबू केला. तेवढ्यात रणजीत पुन्हा ओरडला.

"दादा, एक मिनिट." रणजीतने पिशवीतून एक घट्ट झाकण असलेला डबा काढला.

"दादा, याच्यात थुंका. रस्त्यावर लालभडक थुंकल्यावर कसं दिसतंय तुम्हीच ठरवा. चांगलं दिसलं असतं तर आपन घरात पन थुकलो असतो, हाय का नाही? मला फक्त सांगत जा...डब्बा हायेच माझ्याजवळ... "

अध्यक्षांनी पिंक गिळत बुलेटला किक मारली...

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}