[शशक' २०२०] - कसाई

कसाई

एकुलत्या एका आईविना वाढविलेल्या मुलीची नवऱ्यामुलाबरोबर पाठवणी करून अप्पा मंगल कार्यालयाच्या एका खुर्चीत विसावले. छोट गाव, गरीबी, सावळी मुलगी इ. नकारार्थी गोष्टींनंतर अचानकच काही चांगले घडले होते. एस.टी मध्ये सापडलेल्या पिशवीतील स्थळांची नीटनेटकी यादी आणि त्यात तारांकीत केलेले हे स्थळ, जणूकाही वरच्याचीच कृपा म्हणत त्यांनी समाधानाने हात जोडले.

काय गजाभाऊ, हे चांगले स्थळ कसे सुटले तुमच्याकडून? दैवी इच्छाच जणू. तारांकीत स्थळांच्या माहितीत सुधारणा करण्याअगोदरच यादी एस.टीत हरवली.
हेच ते दोघे भामटे पिता-पुत्र. यांनी कित्येक गरीब मुलींशी लग्न करून त्यांना वाममार्गाला लावले आहे. आज अजून एक गाय या कसायांच्या ताब्यात फसली.

कोपर्‍यात छाती धरून निपचीत पडलेले अप्पा नातेवाईकांना सापडले.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}