[शशक' २०२०] - आकर्षणाचा सिद्धांत

आकर्षणाचा सिद्धांत

विचारांच्या चिखलात रुतलेला मध्यमवर्गीय माणूस आणि विहिरीतील बेडूक यांची परिस्थिती सारखीच. आपण आपल्या भोवतालच्या काटेरी कुंपणातून निघून खुल्या आसमंतात वावरलं पाहिजे. ज्या परिस्थितीत आपण जन्मलो त्यातच मेलो तर अश्या पापकर्मीयांना नरकात अव्वल स्थान आहे.

आपण जसा विचार करतो तसच जीवन आपल्या पदरी पडते. असा आकर्षणाचा सिद्धांत सांगतो. सकारात्मक विचारसरणीची महेंद्रसिंग धोनी, अब्राहम लिंकन.....अशी मूर्तिमंत उदाहरणे आहेत.

आयुष्यच्या कोणत्याही टप्प्यावर जर काय करावं हे कळत नसेल तर टोकाच्या निर्णयाऐवजी पुन्हा शून्यापासून केलेली सुरुवात ही कधीही योग्यच आहे. एकोणावीशीत जर मला ह्या गोष्टी कळल्या, आपण तर माझ्या पेक्षा मोठे आहात.

अश्याच विचारसरणीतून येत्या दशकात या धर्तीवरचा नामांकित हृदयरोगतज्ञ म्हणून मी नावलौकिकास येईल.....

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}