[शशक' २०२०] - बहिष्कार

बहिष्कार

"तुम्ही लोहाना समाजाचे अध्यक्ष आहात, आमच्यावरील बहिष्कार उठवा. मला पुन्हा आपल्या जातीत घ्या, मानलं की आम्ही मासळी उद्योगातून पैसे कमावले, व्यवसायाला कुठला आलाय जात धर्म? कृपा करून आम्हाला जातीबाहेर काढू नका"

"प्रेमजीभाई, आपला धर्म आणी जातीशी तुम्ही गद्दारी केलीय, तुम्हाला परत जातीत घेता येणार नाही, चला निघा."

"व्यापार करण्यात चूक काय? इतका कर्मठ असेल धर्म तर ठीक आहे, मला तुमची जातही नको आणी धर्म ही नको, ह्यापुढे मी आणी माझे कुटुंब आम्ही मुस्लिम धर्म स्वीकारतो, पण लक्षात असू द्या भविष्यात ह्याचे वाईट परीणाम होतील"

14 ऑगस्ट 1947 रेडिओ वरील बातमी - आज महंमद अली जीन्नाह ह्यांच्या प्रयत्नांनी पाकिस्तान राष्ट्र अस्तित्वात आलेय.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}