दुर्लक्ष

महेंद्र चहासाठी हाक आल्यावर उठला. डोळ्यांच्या कोपऱ्यातून येणाऱ्या कटाक्षांकडे दुर्लक्ष करत त्याने दात घासले. विनिता आणि आई बाबा आपल्या काळजीत आहे का त्याला माहित नाही ? इतक्या दिवसांनी तिच्यासोबत आणि निशीसोबत मोकळा वेळ मिळत होता. तर हा माणूस असा दुर्मुखलेला का असतो ? किती दिवसांनी मुंबईच्या गर्दीपासून लांब गावात निवांत राहता आलं. बाळासोबत तर खेळणे पहिल्या दोन महिन्यांनंतर मिळालेच नव्हते.
आईबाबांसोबत व्हरांड्यात बसून चहा, निशीची बडबड, बाळासोबत विमान-विमान, विनिताची कातीव मान... यात का नाही रमतेस तू ? अशी कुठली शक्यता आहे त्याचा विचार करायला सुद्धा घाबरतोयस ?
बेसिनमध्ये कफ थुंकून,साबणाने हात धुऊन महेंद्र स्वयंपाकघराकडे वळला. काही गोष्टी शब्दात पकडल्या तर खऱ्या होतात.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}