लव्हमॅरेजचा किडा

ऑफिसात मुली सतत माझ्याबरोबर बोलण्यासाठीचं एकही कारण सोडत नसत. कारण कुणाचं ठाऊक जिभेवरची साखर की, सर्व कामं चुटकीसरशी करण्याची करामत. त्यातच आईबाबांची माझ्या लग्नासाठी असलेली घाई. पण बहाद्दरच्या डोक्यात लव्हमॅरेज करण्याचा किडा.
नेहमीप्रमाणे बसमधून घरी जाताना माझ्यासमोर एक सुंदर, लोभस, कुणीही बघताचक्षणी प्रेमात पडावं अशी विशीतील मुलगी उभी होती. त्या दिवसापासून बसमध्ये समोरासमोर येण्याचा आमचा रोजचाच दिनक्रम सुरू झाला. नजरानजर भिडली की, हळूच एकमेकांचं गालातल्या गालात हसणं सुरू झालं.
एकेदिवशी मी तिच्याबरोबर स्टॉपवर उतरलो. काही अंतर पुढे गेल्यावर मी तीला थांबवले आणि विचारले, ' माझ्याबरोबर मैत्री करायला आवडेल काय?' ती क्षणाचाही विलंब न करता उत्तरली...
"हो साहेब पण पाचशे रुपये घेईन."

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}