[शशक' २०२०] - अर्थतज्ञ

अर्थतज्ञ

तसा तो सगळे नियम पाळून रहात होता. पण सुरवातीचा काळ गेल्यावर, तरीही लॉकडाऊन चालू ठेवणे कितपत उपयोगी ठरेल याबद्दल साशंक होता.

आपली मते तो नेटवर नेटाने मांडत होता. रोगाच्या प्रसाराएवढेच आर्थिक परिस्थितीचेही भान ठेवले पाहिजे, असा त्याचा आग्रह होता.

पण लॉकडाऊन वाढतच गेला. पुढे पुढे जीवनावश्यक गोष्टींचाही तुटवडा वाढला. सरकारला बर्‍याच सवलती द्याव्या लागल्या.

आता घरोघरी तपासणी सुरु झाली. त्याचीही झाली.आणि तो बाधित निघाला. तडक रवानगी हॉस्पिटलमध्ये! पण लक्षणे काहीच नव्हती.

तीन आठवड्यांनंतर सुटका झाली. जगाचे व्यवहार बरेच चालू झाले होते. त्याने कंपनीत फोन केला. कोणी उचलला नाही.

तो कंपनीत गेला. नोटीसबोर्डावर ती लिस्ट होती! त्याचेही नांव होते त्यांत!!!

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}