इच्छा

(पुणे)
अग, तुला लॅपटॉप तरी लावता येतो का? कशाला घेतेस?
असुद्या, सिडीज पण घेतल्यात.
(विमानामध्ये)
सुनबाईने मस्त नाष्टा केला होता नाही ? प्रसादनेहि तुमच्या आवडीच्या बाकरवड्या दिल्यात.
सुधाकरः आणि चिऊ तर माझ्या कडेवरुन परत माघारीच जात नव्हती.
(हॉटेल, केरळ)
मी: कितीदा पहायची लग्नाची सिडी ? असे करा अनु झाल्या पासुन लावा..
सुधाकरः yes majesty.
मी: अनु कशी गोड बाहुली दिसते आहे ना ? प्रसाद चिडकाच होता.
सुधाकरः तो बघ, आपण लपल्यावर कसा कावराबावरा झालाय, रडतोय बघ कसा.
.
.
मी: चार वाजले पहाटेचे, झोपायचे आहे की नाही, पार अनुच्या लग्नाचे फोटो पण पाहिले आत्ता.
प्रसादः काय लिहिले होते चिठ्ठी मध्ये ?
हॉटेलमॅनेजरः इच्छामरण.. कोणीही जबाबदार नाही.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}