खाकी

कोरोना विषाणूमुळे लागलेला बंद म्हणजे सर्वांसाठीच घर म्हणजे तुरुंग असा सर्वांनाच बऱ्याच दिवसांपासून येत असलेला अनुभव.
अशा तुरुंगातून विनाकारण पळून जाण्याचा प्रयत्न केला की, चौकाचौकात तैनात असलेल्या पहारेकऱ्यांचा चांगलाच प्रसाद मिळाला म्हणून समजा.
अशातच चौकातील एका कोपऱ्यात एक वयस्कर भिकारी जोडपे दोन दिवसांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी कुणाची तरी वाट पाहत होते. चौकातच लोकांना मिळणारा प्रसाद बघून धास्तावलेल्या जोडप्याला बाहेर येण्याची हिम्मत मात्र होत नव्हती.
त्यातच एक पोलीस अधिकारी त्यांच्याकडे कूच करत आल्याचे बघून विनामांसाचे त्यांचे शरीर अजून लपवून ठेवण्याच्या त्यांच्या केविलवाण्या प्रयत्नांच्या पुढेच त्या जोडप्याच्या डोळयांत अजून एक दिवस जीवन अनुभवण्याची ताकद दिसू लागली ती खाकीतल्या देवाने त्यांच्यासमोर ठेवलेल्या डब्यातून.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}