प्रतीक्षा

खरं म्हणजे तो येणार होता. त्याने आजपर्यंत कधीच त्याची वेळ चुकवली नव्हती.
तरीही तिच्या मनाची हुरहूर काही थांबत नव्हती. तशी खात्री होती तिला, पण ह्या आजाराने सगळ्यांचे सगळे बेत धुळीस मिळवलेले. अश्या वेळी त्याच्या येण्याची खात्री तरी कशी वाटणार....
बरं, कोणाला काही विचारायचीसुद्धा सोय नाही... सगळे तिच्याइतकेच अनभिज्ञ. त्यापेक्षा न बोलता वाट पाहिलेली बरी असा सुज्ञ विचार करून ती शांत राहात होती.
पण जशी त्याची येण्याची तारीख जवळ यायला लागली तशी हिच्या मनाची उलघालसुद्धा वाढू लागली.
अखेर तो दिवस आला, आणि तिचा आनंद गगनात मावेना...
सगळ्या संकटावर मात करून तो अखेर आलाच.
महिनाभर ऑफिस बंद असूनसुद्धा मागच्या महिन्याचा पूर्ण पगार....

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}