शाम सवेरा

1

ही पाककृती संजीव कपूर ह्यांच्या येलोचिली पुस्तकातली त्यांची सिग्नेचर डिश आहे।

पाककृती चा दुवा देत आहे. करताना मज्जा आली. खर सांगायचं तर ही करायला सोप्पी आहे फक्त वेळकाढू आहे, पण घरात पार्टी ला आदल्या दिवशी तयारी करून ठेवली तर आयत्यावेळी फक्त पालक चे कोफ्ते तळून ही करता येईल. [अर्थात लॉक डाऊन नंतरच्या आफ्टर पार्ट्यांबद्दल बोलतोय मी ]

महत्वाचा मुद्दा म्हणजे पालक कोफ्ते करताना ते मिश्रण चांगलं परतून घायचं आहे, अगदी त्याचा गोळा होईस्तोवर आणि पॅन सोडायला लागलं की समजावे ते तयार आहे. हे मिश्रण फ्रिज मध्ये लावावे, (मी आदल्या दिवशी करून रात्रभर फ्रिज ला लावलेले, कोफ्ते करण्या आधी २ तास बाहेर काढले आणि पुन्हा छान मळून घेतले.

आपल्या साध्या पोळी सोबत छान लागते पण तवा पराठा असेल तर अजून मज्जा येईल.

2