[शशक' २०२०] - कमाई

कमाई

त्वरेने स्टेशनचा जिना चढतानाही हॅटवाल्याचा पाठलाग करीत होतो. मी गस्तीवर असताना पार्सल्च्या बदल्यात मिळालेली नोटानी भरलेली बॅग त्याने उघडलेली मला दिसली . दिवसभरात मी त्याच्या मागावर होतो," याच्यावर डल्ला मारायचच !" . सगळीकडे सामसूम . जिना चढून जाताच एका झेपेत मी त्याला गाठले. तोच वीज कडाडली .साला बॅग सोडायला तयार नव्हता. . जोराने बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत मी झटापटीत त्याचे डोके पुलाच्या लोखण्डी कठड्यावर आदळले. घेरी आलेल्या अवस्थेत कोसळतच , त्याने ती बॅग खाली रूळात फेकली. त्याला बेशुद्धावस्थेत टाकून मी खाली धावलो. बॅगेतून नोटा रूळामधे विखुरल्या होत्या. पाउस चालू झाला. भिजतच बॅग उचलली. माझे खाली लक्ष गेले ." अरे देवा , पाण्याने नोटावरची शाई वाहू लागली होती."

टीप : एका जुन्या इंग्लिश चित्रपटावर आधारित.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}