सॄजन!

"आज काय करणार तो कोण जाणे.. दररोज आपलं इकडचं तिकडे!"
"तुझी कौलं तरी शाबूत आहेत.. माझ्या पानांची तर दर दिवशी नवीन झैरात होते! पण कालची चांगली होती जरा."
"ख्या..ख्या.. ते बरीक खरं हां.. आधी तर पुंगळ्या होत्या.. समजतंच नव्हतं की नक्की आहे काय!"
"बास हां.. आधीच सटकलेलं आहे. काल तर आजुबाजूला पाणीच दिसायला लागलं होतं.. एरवी काही फुलं वगैरे तरी असतात..!"
"जाऊ दे रे.. नवीन काय ते पाह्यचं.. वैतागलो तरी आपण वाट बघतोच ना दररोज त्याची?"
त्या इवल्या हातांनी हळूच बाबाची स्केचबुक खाली घेतली आणि पलंगाखालच्या नेहमीच्या जागेत स्वारी निघाली.. आज त्या झाडाला घराच्या मागे तो नक्की फिट्ट करणार होता!

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}