जमा

तो पैसे काढायला बँकेत गेला होता. शनिवार असल्याने आज जास्तच गर्दी होती. कोपऱ्यात जाऊन तो स्लिप भरू लागला. तेवढ्यात त्याच्यामागे एक म्हातारी येऊन उभी राहिली. "पोरा, एवढी पावती भरून देतं का?", तिने विचारले.
"किती पैसे भरायचे आहेत?"
"दोन हजार रुपये हाय बाप्पा".
त्याने पावती भरून तिला परत दिली.
"पोट्टीच्या लग्नासाठी पैसे जमवून रायली. अठरा हजार झाले पाय जमा आतापर्यंत", पावती परत घेत तिने सांगितले. तिचे डोळे वेगळेच चमकत होते.
काम झाल्यावर तो मारुतीच्या मंदिराकडे निघाला. बाहेर आवारात चपला काढून तो आत जायला लागला. तेवढ्यात त्याला मागून आवाज आला.
"गरीबाले द्या हो कायीतरी".
त्याने बघितले तर मघाचीच म्हातारी मागे उभी होती.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}