पषम् पूरी हा केरळी प्रकार आहे. राजेळी केळ्याची भजी. कोची, तिरुवनंथपुरम जाणाऱ्या रेल्वेत हा पदार्थ नाश्त्याला मिळतो. चहा आणि गरम पषम् पुरी खातात. कसे करायचे याचे विडिओ युट्युबवर बरेच आहेत. केरळी लोक मोठी वरून लाल सालीची आणि आतून सोनेरी पिवळसर असलेली राजेळी केळीच वापरतात. पण आपण इथे साधे केळेच वापरले आहे.
लॉकडाऊनमुळे अगदी साधे सोपे आणि पौष्टिक प्रकार करण्यासाठी उत्तम.
कृती
फोटो १
पदार्थ आणि तयारी.
दोन छोटे चमचे मैदा, एक छोटा चमचा तांदूळ पीठ, किंचीत मीठ, किंचित हळद, एक छोटा चमचा दही, साखर चवीनुसार (दोन चमचे) घालून पीठ भिजवून दोन तास ठेवायचे.
फोटो २
केळ्याचे लांबडे जाडसर काप काढून पिठात भिजवून तेलात तळायचे. सनफ्लावर तेल वापरले. केरळी लोक खोबऱ्याच्या तेलात तळत असले तरी आपल्याला जमायचे नाही.
हे पीठ मैद्याचे असल्याने अगदी कामापुरते घ्यावे लागते कारण इतर बेसनचे पीठ उरल्यास ते निरनिराळ्या भज्यांसाठी संपवता येते तसे याचे नाही.
फोटो ३
तळताना.
फोटो ४
पषम् पूरी तयार.
भजी गोडसर असल्याने फार करून उपयोग नाही. म्हणून थोडाच प्रयोग केला. रेल्वेत खिडकीत बसून बाहेरचा निसर्ग पाहाण्याची मजा आता घेता येणार नाही पण घराच्या बाल्कनीत बसून पषमपूरी आणि चहा घेऊन पाहा.