[शशक' २०२०] - कजाग

कजाग

मी निवांत बसलो होतो .चंद्या आला .शंकर गेल्याचं सांगायला.
शंकर आमचा जवळचा मित्र. निर्व्यसनी माणूस. आमच्यासारखं नव्हतं ! अन असा माणूस एकाएकी गेला होता. खूप वाईट वाटलं .
आम्ही त्याच्या घरी पोचलो. लोक जमले होते. रडणाऱ्या बायका. त्यात त्याचीही बायको .
नंतर आम्ही बाहेर जाऊन शांतपणे बसलो. लोकांची बडबड आणि गडबड पहात! थोड्या वेळाने सारं पार पडलं. आता निघायचं -
आणि त्याच्या बायकोने आकांत मांडला. ते पाहवत नव्हतं.
“बघ, कशी रडते साली ! आयुष्यभर नवऱ्याला रडवलं आणि आता स्वतः रडतेय . कजाग बाई ! “ चंद्या म्हणाला.
मी मान डोलवली .
बायका असंच करतात. अहो खरंच ! मी गेलो होतो - तेव्हा माझीही बायको अशीच रडली होती. पार माझ्या अंगावर पडून !

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}