आजी

“आजोबा, मला आजी का नाही?” सिनियर केजीमधल्या चिंटूने विचारलं.
त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नावर मी चमकलोच,” का रे? “
“साहिलची आजी किती मस्त आहे ! मलापण अशी एक आजी पाहिजे .”
मी गप्पच झालो. मला अमिताची आठवण आली . आमचं लव्हमॅरेज. पण पुढे बिनसतच गेलं. मी सावरण्याचा खूप प्रयत्न केला .पण नाही! तिने पुढे दुसरं लग्न केलं. मी तसाच राहिलो .तिच्या आठवणींमध्ये झुरत .
अन आता चिंटूला आजी पाहिजे म्हणून, पुन्हा दुसरं लग्न करायचं?...
संध्याकाळी चिंटूची आई आली. त्याला तिचा मोबाईल खेळायला मिळाला.
मध्येच त्याने मला मोबाईल दिला व एका आनंदी कुटुंबाचा फोटो दाखवला . मोठा करून पाहिला अन काळजातच कळ आली .
साहिलची आजी म्हणजे अमिता होती !

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}