[शशक' २०२०] - छंद

छंद

"लायब्ररीचं खातं बंद करून आलो."
"अरे कर्मा! अहो, पोरीला वाचनाचा छंद म्हणून आठवड्याला एखादं पुस्तक नेऊन द्यायचात ना तिच्यासाठी? ऑफिसमधून येऊन घरकाम आवरल्यावर थोडा वेळ वाचायला मिळालं की खुश असायच्या बाईसाहेब. पण हल्ली वेळ मिळत नाही म्हणत होती. सासूबाई पूर्वी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवायच्या. पण आताशा स्वयंपाकघराकडे फिरकत नाहीत म्हणे. पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा!"
"अग, ऐक तरी माझं. आज दुपारी गेलो होतो पुस्तक परत आणायला. सासरे म्हणतात कसे, आमच्या हिचा दिवस चांगला जातो हल्ली तुमच्या पुस्तकांमुळे. कंटाळून जायची बिचारी घरकाम करून. आता दुपारची जेवणं झाल्यावर जी पुस्तक घेऊन बसते, ती संध्याकाळी सिरियली पाहायलाच उठते. चांगला छंद लावलात तिला."

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}