प्रसाद

आत मूर्तीचं मनासारखं दर्शन आणि बाहेर आपल्या शाबूत चपला, यापेक्षा सच्च्या भक्तांना देवळांत काय हवं असतं? दोन्ही मिळालं होतं. आता भूक आणि ऊन यांच्या निराकरणासाठी समाधानी भक्तगणांचे पाय सरसावले होते.
एक भिकारी त्यांच्या बाजूने चालत होता. मागितलं तर काहीच नव्हतं तरीही हातात फळांची पिशवी असलेल्याला दया आली. काही फळं त्याच्या हातात ठेवली गेली.
गाडीजवळ पोचल्यावर कोणाला तरी तो फळांच्या दुकानात दिसला. पुनर्विक्रीची सोपी अर्थनीती उमगून सगळयांच्या जिभांनी जागीच यथेच्छ गोळीबार झाडला.
हातात ताट घेऊन तो काचेवर टकटक करत होता.
काच किंचित खाली झाल्यावर आमच्या खवचटपणाच्या उद्रेकाला वाव न देताच म्हणाला,
" घाईत जनू? तुमास्नी फोडी करून आनल्यात. घ्या परसाद. संपवा समदं."

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}