[शशक' २०२०] - सूड

सूड

त्याचे असंख्य नातेवाईक त्याच्या डोळ्यासमोरच मारले गेले होते. मृतदेह जळतानाचा तो विचित्र वास स्मृतीत साठून राहिला होता. त्या आठवणींनी त्याला भडभडून आलं.
सूडाच्या उद्देशानं तो पेटून उठला होता. पण त्याचा एकही प्रयत्न यशस्वी ठरत नव्हता.शत्रूकडे त्याच्या सगळ्या हल्ल्यांना परतवून लावण्याची ताकद होती.

आजचा दिवस काही निराळाच उजाडला.

त्याची एका नव्या खेळाडूशी ओळख झाली. माणसं मारण्यात हा नवखा भिडू तरबेज होता.
शांतपणे, कुठल्याही हालचालींशिवाय तासनतास सावजाची वाट पाहण्याचा संयम त्याच्याकडे होता.

दोघांनी हातमिळवणी केली.

ह्या जोडीनं थंड डोक्याने शत्रूला गारद करायला सुरवात केली. दणादण मुडदे पडू लागले. कोणाला पुसटशीही शंका अजून आलेली नव्हती.

करोना विषाणू आता डासांमार्फत पसरायला लागला होता.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}