मित्राच्या बागेत बरक्या फणसाचे झाड आहे। त्याची भाजी छान होते असे त्याची आई म्हणाली। मी पटकन "मग बिर्याणी पण छान होईल" असे बोलून गेलो! मग काय, दिला त्यांनी एक कच्चा फणस तोडून।
शेफ रणवीर ब्रार च्या फणसाच्या बिर्याणी वरून प्रेरणा घेऊन ही बनवली, आणि रीतसर पोरांनी आणि आमच्या शाकाहारी बायकोने चापली! एक डब्बा मित्राच्या घरी आवर्जून दिला, आणि त्याच्या आईने पसंती दर्शवली हे वेगळे सांगायला नको!
शेफ रणवीर ब्रार च्या पाककृतीचा हा दुवा. मी साधारण ३०० ते ३५० ग्राम कच्चा फणस वापरला, आणि मोजून ४०० ग्राम बासमती तांदूळ. त्याच्या रेसिपी मध्ये मी थोडे बदल केले, उदारणार्थ तळलेला काजू वापरणे, मिठा इत्तर, दुधात भिजवलेले केसर वापरणे वैगेरे.
रेसिपी दुवा आहे त्यामुळे वेगळी रेसिपी देत नाही. प्रेझेन्टेशन अर्थात डोक्यात होतेच, यामुळे पटकन जमले. कच्चा फणस शिजल्यावर अगदी मटणासारखा लागतो, त्यामुळे मांसाहारी लोकांना देखल आवडेल हि बिर्याणी.