ढब्बू मिरची पनीर इंडो चिनी

आंबट गोड खारट अशी काहीशी चव आणण्याचा प्रयत्न आहे यात
साहित्य
-ताज्या लसणीचे काप
- पनीर चे छोटे तुकडे
-छोटे चेरी टोमॅटो
- हिरव्या ढब्बू मिरची चे माध्यम काप
- तांबडे तिखट ?( फ्लेक)
- पातीचा कांदा ( पाहिजे असल्यास कोथिंबीर)
- पांढरे व्हिनेगर
- शेंगदाणा तेल
- गोड मिरची सॉस ( स्वीट चिली सॉस)
- जाड लोखंडी तवा आणि वॊक

एकीकडे जाड लोखंडी तवा ( फोटोत ग्रीडल वापरले आहे) चांगलं गरम करून त्यावर तेल सोडावे आणि ढब्बू मिरची चे तुकडे भाजावे / परतावे
( तवा जाड असावा उपहारगृहात कबाब / सिझलर ज्यावर वाढतात चुर्रर्र आवाज करीत तसला )
कढई किंवा वॊक चांगलं तापल्यावर तेल घालून लसूण परतवूं घायवी आणि त्यावर तीखटाची भरड कूट ( फ्लेक) पण
मग पनीर परतावा ... जळणार नाही हे पहा ( माझा चाललं आणि लोखंडाच्या वॊक मुळे जरा काळसर पण आला )
जरा आच कमी करावी आणि मग व्हिनेगर आणि गोडसर चिली सॉस घालावे
आधी भाजलेली ढब्बू मीरची मग यात घालावी
शक्यतो झाकण ठेवू नये
चव घेऊन मीठ आणि थोडी साखर घालावी
थोडे पाणी सुटेल .. ते पूर्ण उडून जायच्या आत आच बंद करावी .. वरून पाणी घालू नये

वरून कापलेले छोटे चेरी टोमॅटो घालावे ( चांगले पिकलेले )

IMG_7379[1]
IMG_7381[1]
IMG_7383[1]