डीकॉन्स्ट्रुकंटेड फ्रुट सलाड

याला "सुट्टी सुट्टी फळफळावळ" असलं काही तरी शीर्षक सुचत होतं....

आज काल डी कॉन्स्ट्रुकंटेड सँडविच इत्यादी ची चलती दिसते.. तर म्हणलं करून बघूया तरी

सोप्प आहे, नेहमीचाच दूध घातलेलं करायचे नसेल तर
फोटुत सर्व आहेच वेगळी पाकक्रिया काही अशी नाही
य पदार्थात पोत( टेक्श्चर) साठी ३ गोष्टी वापरल्या आहेत

- खुसखुशीत पणा साठी सुकलेला केक ( उत्तर हिंदुस्तानांत केक रस्क ,, हा बदामाचा आहे ) किंवा भाजलेलं बदाम काप / अक्रोड पण वापरू शकता
- मऊ पोत म्हणून ( आणि गोडवा) फळे - चांगली पिकलेली
- वेल्वेट सारखा पोत म्हणून फेसलेली साय ( क्रीम) त्यात पाहिजे तसे स्वाद , ( यात केशर आहे) किंवा नेहमीचेच म्हणजे कस्टर्ड वापरू शकता !
पीच , प्लम, चेरी ( फ्रोझन वापरली आहे ताजी असल्यास उत्तम) कापआणि वेगळा म्हणून फणसाच्या कापाचे बारीक उभट काप.

वाढणे:
हा केक तसा कडक असतो , वरील फळांना जर थोडे पाणी सुटले तर तो रस प्रथम केक च्या तुकडयांवर सोडावा म्हजे ते थोडे मऊ होतील
बाकी मग पाहिजे तसे "कोन्स्ट्रुक्ट " करावे
IMG_7372[1]