"स्पॉंजी दहीवडा "

नमस्कार मंडळी , कसे आहात ?
सगळयांना हॅपी वाला न्यूइअर _/\_

एकेकाळी मिपाचा पाककृती विभाग नुसता ओसंडून वाहत होता. त्यात माझ्या पण बर्याच रेसेपी यायच्या लगोलग ;)
एकतर मिपावर नवीन त्यात भारीचा उत्साह ! केलं काही का टाक मिपावर ! आणि प्रतिसाद आले कि जाम भारी वाटायचं रात्री अपरात्री मोबाईल चेकवून किती प्रतिसाद आलेत ते पाहिलं जायचं, कमी असतील तर काउंट वाढवण्यासाठी लोकांच्या खरडीत जाऊन " ओ माझी रेसेपी नाही वाचली का ? प्रतिसाद द्याना हे पण सांगुण व्हायच :) :०
तेव्हा इतकी पकाऊगिरी केली आपलं हे पाककृती केली कि लोकांनी माझं "पियुशा "च "जिल्बुशा " असं बारस करून टाकलं ;) पण मी काही मनावर घेतलं नाही ती गोष्ट वेगळी ;) असो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ते जुने मिपाकर पण कुठे तरी हरवले :( असो नव्या लोकांबरोबर मिपा पुढे पुढे चालत राहावं नवे नवे सदस्य येत राहावे आणि मिपाचं नंदनवन असच फुलत राहावं असं बोलून (लिहून) मी आपली रेसेपी चालू करते .
आजची रेसेपी आहे "स्पॉंजी दहीवडा " थन्डीचे दिवस आणि दहिवडा ? असा प्रश्न पडू शकतो पण त्याला उत्तर " जब दिल चाहा बना लिया और खालिया बाकी मौसम गया तेल लेने "तर घ्या साहित्य लिहुन .
साहित्य -
१) १ वाटी उडीददाळ
२)चवीपुरते मीठ
३) तळण्यासाठी तेल
४)दही + साखर (तुम्हाला हवे तितके )
५) बारीक किंवा जाड शेव
६)चिंच गुळाची चटणी
७)चाट मसाला
८)लाल तिखट
* चिंच गुळ चटनी खूप सोप्पी एक वाटी चिंच घेऊन एक तास गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ करून घेणे त्यात गुळ किसून घालणे . एक चुटकी मीठ आणि एक चुटकी लाल तिखट मस्त एकजीव करून एक उकळी काढून घेणे थोडी घट्ट झाली कि चटणी तय्यार !

कृती -
उडीद डाळ ४ ते ५ तास पाण्यात भिजवून नंतर निथळून मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे .शकयतो पाणी न घालता वाटायची अगदीच गरज लागली तर एखादा चमचा पाणी घालून वाटावी . ही डाळ चिवट असल्यामुळे थोडी कठीण असते वाटायला त्या साठी टीप म्हणजे मिक्सर सलग न चालवता १० -१५ सेकंद चालवून ब्रेक घेऊन वाटून घेणे .आता मिश्रण बारीक झाले कि त्यात चवी पुरते मीठ घालून त्या मिश्रनाला हलंके होई पर्यन्त फेटून घेणे निदांन ७-८ मिनिट तरी लागतील मिश्रण हलकं व्हायला .तुम्ही नाजुका असाल तर ही अशी फेटायची "सोप्पी" काम नवरा , भाऊ , पप्पा अशा मंडळी कडे द्यावीत त्याने काय होत त्यांचे मसल्स बनतात मस्त पैकी !!! आणि बाप्ये मंडळीं बनवत असतील तर त्यांनी स्वता:ची कामे स्वतःच करावी ;)
जितकं मिश्रण हलक तितके वडे स्पॉंजी बनतील ,आता कस ओळखणार हलकं झालं कि नाही ? तर एक काम करा ,एक वाटी घ्या ,त्यात पाणी घ्या आणि त्यात मिश्रनाचा छोटुसा गोळा टाका तो वर तरंगला कि समजायचं काम फत्ते !!!
आता तेल गरम करून त्यात भजिच्या आकाराचे गोळे सोडून मस्त बदामि रंगावर तळून घ्या .
सर्व वडे तळून झाले की एका भांड्यात थोडं कोमट पाणी घेऊन त्यात चुटकीभर हिंग टाकून हे वडे त्या पाण्यात १०-१५ मिनिट भिजू द्या . हि भिजवण्याची कृती वडे सर्व्ह करणार असाल त्या आधी करा .
आता दही +साखर मऊसूत फेटून फ्रीज मध्ये ठेवून द्या ही कृती तुम्हाला कितपत थंड दही हवं आहे त्यानुसार ठरवा मी सर्व्ह करायच्या तासभर आधी ठेवलं होत
बस्स !!!
आता वडे पाण्यातून काढून थोडेसे हलके दाबून त्यातील पाणी काढून घ्या एका बाउल मध्ये वडे , त्यावर मस्त फेटलेले थंड गोड दही घाला , थोडा चाट मसाला आणि लाल तिखट भुरभुरवा . थोडी चिंच गुळ चटणी , आणि थोडी शेव अहाहा मस्त मस्त !!
यात डाळिंब दाणे , खजूर चटणी , हिरवी तिखट चटणी ही घालू शकता तुमची चॉईस !

स्टेप बाय स्टेप फोटो देत आहे
फेट्लेल मिश्रण :
a

तळुन भिजवलेले वडे :
b

बाउल मध्ये :
e

दही / मसाला /तिखट/चटनी/शेव
f

रेडी टु ईट
g