India Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक

India Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक

थोडक्यात प्रार्श्वभुमी:

व्हाट्सअ‍ॅप च्या सहाय्याने दुनियेतील जवळजवळ १४०० लोकांची हेरगिरी करण्यात आली त्यात भारतातील काही लोक(पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर) आहेत. यात फक्त फोन टॅपिंग नाही तर युजरची सगळी माहीती, फोन नंबर्स , पासवर्ड , फोटो, इमेल, संभाषण, सगळ्या गतिविधिया, आपण कधी कोठे जाणार आहात , लोकेशन ट्रॅकींग, कॅमेरा ओपन करुन माहिती अशी हि सगळी माहीती एका जाग्यावर बसुन कळते.
उदाहरण द्यायचे झाल्यास जमाल अहमद ख़ाशग़्जी(सऊदी अरब) जे वॉशिंग्टन पोस्ट चे पत्रकार होते त्यांची २ ऑक्टों २०१८ ला सऊदी अरब वाणिज्य दूतावास इस्तांबुल (तुर्की) येथे हत्या करण्यात आली. त्यांचा फोन याच इजराईली सोफ्टवेअर द्वारा हॅक करुन ते कुठे, कधी आणि का भेटत होते ही सगळी माहीती मिळत होती. यावर खटला चालु आहे.

तर नुकत्याच आलेल्या इंडियन एक्सप्रेस च्या बातमी नुसार, व्हाटसअ‍ॅप ने या विरोधात, पिगासस हे सोफ्टवेअर बनवणार्या कंपणीवरती म्हणजे एनएसओ आणि क्यु सायबर टेक्नॉलॉजी वरती खटला दाखल केलेला आहे. आणि ही माहीती उघड झाल्या नंतर आपल्या सरकारने केंद्रीय विधी आणि न्याय, संवाद, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्हाट्सअ‍ॅप कडुन खुलासा मागितला आहे.

तर इजराईली कंपणी एनएसओ चे म्हणणे आहे त्यांनी काही गैर केले नाही, ते हे सॉफ्टवेअर फक्त सरकारला कींवा सरकारी कंपणीला विकतात, आणि त्याचा उद्देश फक्त देशद्रोही आणि घातक लोकांसाठी केला जातो.

सविस्तर
इस्त्रायलच्या स्पायवेअर पिगाससद्वारा भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात येत असल्याचं व्हाट्सअ‍ॅप ने गुरुवारी मान्य केलं. तसेच हे सोफ्ट्वेअर तयार करणाऱ्या एनएसओ ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही व्हाट्सअ‍ॅप ने स्पष्ट केलं आहे. कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात एनएसओ विरोधात खटला भरण्यात आला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
याही पुढे जावुन "भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवरही पाळत ठेवली गेली आहे. मी त्यांचं नावं जाहीर करू शकत नाही किंवा त्यांचे नंबरही जाहीर करू शकत नाही. परंतु त्यांची संख्या भरपूर आहे," असं मत व्हाट्सअ‍ॅप प्रवक्ते कार्ल वूग यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं. व्हाट्सअ‍ॅप ने यापैकी प्रत्येकाशी संपर्क करून सायबरहल्ल्याची माहिती दिल्याचंही वूग यांनी सांगितलं आहे.

तर इसराईली कंपणी एनएसवो ने सांगितले आहे की ते हे सॉफ्टवेअर फक्त सरकारला विकते, आणि ते ही कायद्याच्या चौकटीत राहुन. NSO ने एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यात कंपनीने म्हटलंय, "हे आरोप आम्हाला मान्य नाहीत. आम्ही याच्या विरोधात लढा देऊ. लायसन्स असणाऱ्या सरकारी गुप्तचर संस्था आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना दहशतवाद आणि गंभीर अपराधांचा मुकाबला करायला मदत करणारी टेक्नॉलॉजी तयार करणं हे NSOचं उद्दिष्टं आहे. मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकाराच्या विरोधात वापर करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान विकसित केलेलं नाही आणि असं करण्याची आम्हाला परवानगीही नाही. आमच्या तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षांमध्ये हजारो लोकांचे प्राण वाचलेले आहेत. गंभीर अपराध, दहशतवाद यांचा शोध घेण्याशिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी आमच्या उत्पादनाचा वापर होणं हा आम्ही दुरुपयोग झाल्याचं मानतो. हे आमच्या करारातही म्हटलेलं आहे. असा कोणत्याही प्रकारचा दुरुपयोग आमच्या लक्षात आला तर आम्ही त्यावर कारवाई करतो."

भारत सरकारणे जरुर व्हाट्सअ‍ॅप ला याबाबत खुलासा मागितला असला, तरी माझ्या मते सरकारणे हे सॉफ्टवेअर विकत घेतले आहे की नाही हे स्पष्टपणे जाहीर करावे. त्यांनी ह्या संबंधी एनसवो ला पण विचारणा आणि स्पष्टीकरण मागितले पाहिजे. परंतु तसे काही होताना दिसत नाहिये. त्यात व्हाट्सअ‍ॅप ने विक्टीम असलेल्या लोकांना पर्सनली कॉन्टक्ट करुन माहीती दिलेली आहे.

मुख्यत्वे ज्या लोकांना कॉन्टॅक्ट केले आहे, त्यांची नावे खाली देतो आहे,.
ज्या लोकांची हेरगिरी आणि पाळत ठेवली गेली त्यांची काही नावे, ज्यांनी स्वता सांगितले आहे की त्यांना व्हाट्सअ‍ॅप ने कॉन्टॅक्ट केले आहे.

१. प्रो. आनंद तेलतुम्बडे : गोवा इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट मध्ये प्रोफेसर आणि सामजिक अधिकार कार्यकर्ते. भिमा कोरेगाव प्रकरणात आरोप दाखल आहेत, जामीनावर बाहेर आहेत.
२. आशिश गुप्ता : पिपल्स युनियन फॉर डेमोक्रॉटीक राईट्स ला जोडलेले आहेत.
३. अंकित ग्रेवाल: वकील, चंदिगड. एलगार परिषद केस मध्ये सुधा भारद्वाज ची केस यांनी लढवलेली होती.
४. सरोज गिरी: : दिल्ली विश्वविद्यालय मध्ये पॉलिटीकल सायन्स चे सहायक प्रोफेसर.
५. सिद्धांत सिब्बल: पत्रकार, वियॉन चॅनेल चे रक्षा संवाददाता
६.राजीव शर्मा : पत्रकार
७. निहालसिंग राठोड:मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील, सुरेंद्र गडलिंग यांच्या जवळचे . गडलिंग यांना कोरेगाव भीमा प्रकरणी अटक करण्यात आली होती. या खटल्यात राठोड हे गडलिंग यांचे वकील म्हणून काम पाहत आहेत.
८. रुपाली जाधव: पुणे, कबीर कला केंद्र की सदस्य.
९. विवेक सुंदर : मुंबई निवासी सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ता, कबीर कला मंच चे सदस्य
१०. बेला भाटिया : छत्तीसगढ़ च्या मानवाधिकार कार्यकर्ता
११. शुभ्रांशु चौधरी : बीबीसी चे पूर्व पत्रकार आणि छत्तीसगढ़ मधील शांति कार्यकर्ता
१२. देग्री प्रसाद चौहान : छत्तीसगढ़ चे दलित अधिकार कार्यकर्ता
१३. शालिनी गेरा : एल्गार परिषद केस मध्ये वकील आणि पीयूसीएल छत्तीसगढ़ च्या सचिव
१४. सीमा आजाद : इलाहाबाद निवासी पीपुल्स यूनियन फार सिविल लिबर्टीज च्या सदस्य
१५. अजमल खान : दिल्ली निवासी ज्यांनी रोहित वेमुला च्या मृत्यु नंतर प्रदर्शन मध्ये भाग घेतला होता.
१६.. संतोष भारतीय : चौथी दुनिया चे संपादक आणि फर्रुखाबाद चे पूर्व लोकसभा सांसद.

माझ्या मनातले थोडेसे

पत्रकारांसारख्या लोकांना त्यांच्या गुप्त सोर्सेसला या सॉफ्टवेअर च्या मदतीने माहीती करुन घेतले तर लोकशाहीत चौथा खांब असलेल्या या लोकांचे भवितव्य काय असेल ? किंवा ते स्पष्ट आणि निडर पद्धतीने काम कसे करतील ? हे जे चालु आहे ते खरेच आपल्या लोकशाहीला ,नागरिकांच्या वयक्तीक खाजगी आयुष्याला नक्कीच मारक आहे. हे सर्व कोणी केले आहे हे आताच कळाले नसले तरी नक्कीच या सर्व लोकांवर लोकसभेच्या निवडनुकीच्या काळात लक्ष ठेवले गेले होते, आणि ते नक्कीच देशविघातक आहे. आणि त्या कंपणीच्या म्हणण्यानुसार ते फक्त सरकार आणि सरकारी एजन्सीला हे सोफ्टवेअर विकतात. त्यामुळे आपल्या सरकारची नैतिक जबाबदारी आहे, यातुन स्पष्ट आणि ठोस आपण त्यात सहभागी नसलो तर सांगायची.सरकारणे हे सॉफ्टवेअर विकत घेतले आहे की नाही हे स्पष्टपणे जाहीर करावे
यावर कोणी काहीही प्रतिक्रियाही देत नाहीये. लोक यावर आजिबात व्यक्त झालेले नाहीत. एक दोन मेडिया सोडले तर यावर विस्तृत असे भाष्य कुठे झालेले नाही. आपल्याबाबतीत ही असंच काहीतरी होण्याची लोक वाट पहात बसले आहेत काय असेच मला आता वाटते आहे. पारदर्शक पद्धतीने हे सर्व लवकरच उलगडले आणि थांबले पाहिजे, नाहीतर लोकशाही चा होणारा अंत जवळच आहे असे मला वाटत आहे, आणि म्हणुनच मला पुन्हा म्हणावेसे वाटते India Deserves Better.

--- गणेश जगताप.
#India_Deserves Better